महाराष्ट्र

खा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडून राऊत कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   शहरातील किर्तीनगर येथील रहिवासी श्रीनिवास राऊत यांचे वडील कै.बबनराव पिलोबा राऊत यांचे दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी अपघाती दुःखद निधन झाले. यांच्या दुःखद निधनाबद्दल दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे बीडचे खा.बजरंग बप्पा सोनवणे यांनी श्रीनिवास राऊत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

किर्तीनगर येथील रहिवासी श्रीनिवास राऊत यांचे वडील व नगर परिषद निवडणूकीतील २०२५ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व मित्र पक्षाच्या प्रभाग क्रमांक 7 अ च्या उमेदवार राजामतीबाई बबनराव राऊत याचे पती कै.बबनराव पिलोबा राऊत यांचे परळी ते गंगाखेड रोडवर ऍटो पलटी होऊन अपघातात दि.१२ डिसेंबर रोजी अपघाती दुःखद निधन  झाले.

कै.बबनराव पिलोबा राऊत हे अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी तथा धार्मिक वृत्तीचे सर्वांसोबत स्नेहबंध जपणारे व्यक्तिमत्त्व होते. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते प्रत्येक जणाच्या ओठावर कै.बबनराव पिलोबा राऊत यांनी ओळख निर्माण केली अतिशय गुणी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. कै.बबनराव पिलोबा राऊत यांच्या दुःखद निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे बीडचे खा.बजरंग बप्पा सोनवणे यांनी भेट घेऊन सांत्वन करून कुटुंबियांना धीर दिला. यावेळी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासमवेत शहराध्यक्ष ऍड. जीवनराव देशमुख, दीपक नाना देशमुख, उत्तम दादा माने , अमित घाडगे , बाबा शिंदे , नितीन बागवाले, नितीन चव्हाण, धनंजय कराळे, वैजनाथ कळसकर ,अक्षय सोनवणे, अमर रोडे , सनी कसबे, प्रणित काळे, रमेश गायकवाड उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!